प्रशांत रामभाऊ सुसर, बुलडाणा ' दिनूचे बिल ' नावाचा एक पाठ शाळेत असताना आम्हाला अभ्यासाला होता. दिनूला त्याची आई घरातील छोटीमोठी कामे सांगते. ती कामे तो करतो. मात्र एक दिवस त्या सर्व कामांचे एक बिल तयार करून आईला देतो. आई ते बिल पाहते. तिला वाईट वाटते मात्र ती दिनूला काहीच न बोलता एक बिल तयार करून झोपलेल्या दिनाच्या उशाशी ठेवते. त्यात दिनूच्या आंघोळी पासून तर आजारपणापर्यंत प्रत्येक कामाची यादी असते. मात्र बिल म्हणून शून्य रुपये दिलेले असतात.ते बिल पाहून दिनूला आपली चूक कळते व तो आईला जाऊन बिलगतो. आपण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तिचे आभार मानतो. तिच्याविषयी प्रेम व्यक्त करतो. परंतु आजही समाजात अनेक लाडावलेल्या बबड्यांना ' आई कुठे काय करते ' असेच वाटत असते. ' मदर्स डे ' च्या निमित्ताने आपण सोशल मीडियावर ढीगभर शुभेच्छा देणार. मात्र आपल्या कपड्यांचा ढीग मात्र आईलाच धुवावा लागणार. जी नऊ महिने आपल्याला पोटात वागवते तिची महती सांगावी तरी किती... ? सुमित्रानंदन पंत म्हणतात ' जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ' अर्थात माता आणि जन्मभूमी...