मुख्य सामग्रीवर वगळा

कविता : गणुची शाळा

 




नविन वर्षात

संकल्प झाला

गणुशाळेत

दाखल झाला.  ।।

बाप रोजच सांगे

गणुशाळेत चल

वाट पहातात

गुरुजी  गणु

लवकर चल  ।।

कालच आले

गुरुजी घरी

शिक्षणाची गंगा

घेउन दारी ।।

गणुला शाळेची

आली हो गोडी

गुरुजींच्या शिकण्याची

जडली हो गोडी   ।।

वाचन लेखनाचा

छंद जडला

गुरुजींच्या पुढे

नाचु लागला   ।।

गुरुजींनी दिली

शाब्बासकीची थाप

गणुला आठवले

माझेच बाप।   ।।

मोल शिक्षणाचं

पटल अंतरी

गुरुजीन दिली

ज्ञानाची शिदोरी   ।।

धन्य जहालो

नशीब उजळलं

माय बापाचं

स्वप्न साकारलं ।।

अधिकारी होऊन

गावी आलो

गुरुजींन पुढे

नतमस्तक झालो।   ।।

गुरू ईश्वर तात माय

गुरुविन जगी थोर काय ।।


वैशाली बच्छाव जि प शाळा झिरेपिंपळ

देवळा, जि. नाशिक


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मूल्यवर्धन: काळाची गरज

  आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.   देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी. परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची. आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना. प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावन...

‘महाराष्ट्र’ नाव कसे पडले?

  शिवकन्या एन. कदेरकर-कोंजारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळ , बालभारती , पुणे सदस्य व सहशिक्षिका मॉर्डन हायस्कूल , सोलापूर                          महाराष्ट्र या नावातच महानता दिसून येते महा मोठे महान असे हे राष्ट्र होय म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे ऐकताना किंवा गाताना अभिमानाने मान ताठ होते ऊर भरून येतो डोळ्यात एक चमक येते. संतांचा देश दऱ्याखोऱ्या आमचा देश शूरवीरांचा देश यासारख्या अनेक नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र कधी कसे पडले याबाबत मात्र अनेक विचार प्रवाह दिसून येतात. प्राप्त झालेले हे नाव लोक वाचत आहे की देश वाचक याबाबत ही प्रश्नचिन्हच आहे. इतिहासाचे अभ्यासक चि. वि. वैद्य यांच्या मते इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास दक्षिण भारतात गोपराष्ट्र ,   पांडुराष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती होत्या त्यातीलच मल्लराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. तसेच इतिहासाचे अभ्यासक रा. गो. भांडारकर यांच्या मते दक्षिणेतील रठ्ठ लोका...

व्यवसाय मार्गदर्शन : मोबाईल टेक्निशियन

     मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर बदलत आहे. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईल धारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन , जोडणी , वितरण , विक्री पश्चात सेवा आदींच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यात कुशल यांत्रिक मनुष्यबळाची गरज बघता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र युवकांना लाभदायी ठरणारे अखंड सुरु राहणारे क्षेत्र आहे. म्हणून मोबाईल दुरुस्ती हा सद्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध नाही. डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विविध संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी तीन महिने , सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात येतो.      आज मोबाईल सर्वांना गरजेचा झाला आहे....