आजच्या काळात फोटोग्राफी हा प्रत्येकाचा आवडीचा विषय बनलेला आहे . प्रकाश - संवेदी वस्तुंद्वारे प्रकाश किंवा विद्युतचुंबकीय उत्सारणाची नोंद करुन टिकाऊ प्रतिमा निर्माण करण्याच्या पद्धतीला फोटोग्राफी म्हणजेच छायाचित्रण असे म्हणतात . खरे तर छायाचित्रण ही एक इतिहास जपून ठेवणारी एक अजरामर कला आणि शास्त्र आहे , ती छायाचित्रकार , त्यासाठी वापरलेला कॅमेरा , छायाचित्रकाराचा दृष्टीकोन आणि वेळ आदी गोष्टींवर अवलंबून असते . छायाचित्रकाराला या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानही अवगत करणे आवश्यक आहे . फोटोग्राफी ही अशी कला आहे जी आपल्या डोळ्यांना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देते . आपण फोटो काढत असताना त्या गोष्टीशी एक भावनिक बंध निर्माण करत असतो . फोटो हे नेहमी बोलके असावेत त्यांच्याशी आपला संवाद व्हायला हवा . एक योग्य आणि सुंदर छायाचित्र संपूर्ण घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो . छायाचित्रण करत असताना त्यातून आपल्याला...