भावना कुळकर्णी अशोका युनिव्हर्सल स्कूल नाशिक बघा माझा इठुराया कसा बोलतो माझ्याशी, म्हणतो मानसान मानसाशी मानुस बनून वागावं, अड़ल्या नड़लेल्या मदत करावी, आंधळ्याचा ड़ोळा बनाव, लंगड़याचा पाय बनाव, मदतीला धावुन जावे, कुणाची तरी काठी होऊन जगावे. लोकांनाही मग खरच वाटायच म्हातारीचं. ते म्हणतं लई भाग्यवान बघा म्हातारी, विठोबा प्रत्यक्ष बोलतो तिच्याशी. चुलीत दोन चार लाकड़ आणखी सरकवुन म्हातारीने तिच्या त्या पोचे गेलेल्या पातेल्यात चहा उकळायला ठेवला. उकळत राहणा ऱ्या चहा प्रमाणेच म्हातारीच मनही आतुन ढवळून निघत होतं ... तीन दिशेला गेलेले तिचे तीन पोरं. त्यातला धाकला तिला सोड़ायचा नाही पण सगळयात मोठा अन मधला गेले होते सोड़ुन. पण आज खुप वर्षानी तीचा मोठ्ठा सायेब झालेला पोरगा आज घरी येणार होता. खर म्हणजे पोटचा गोळा घरी येणार म्हणून म्हातारी खुप आनंदात होती , मनातुन धास्तावलेली. त्याला कारणही तसच होत म्हणा. जमीनजुमला, शेतीवाड़ीच काय ते निपटुन टाकायचे म्हणून हे पोरग वस्तीवर येणार होत , अ...