"मंजिल
मिले ना मिले ऐ तो मुकदर की बात है | हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात
है | जिंदगी जख्मो से भरी है, वक्त को
मरहम बनाना सिख लो | हारना तो एक दिन मौत से फिलहाल जिंदगी
को जिना सिख लो |
मी उषा कोष्टी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा
घरनिकी येथे कार्यरत आहे. आज माझ्या शिक्षण क्षेत्रातील सेवेला २५ वर्ष पूर्ण
झाली. खरच किती सहज बघता बघता हे दिवस निघून गेले समजलेच नाही. मला आज ही वाटत
इतक्या लवकर पंचवीस वर्ष पूर्ण झाली. शिक्षक होणे हे भाग्यवान लोकांचेच काम आहे.
स्वतःला सर्मपित करून प्रामाणिक पणे काम केल्यावर जगात कितीही अडथळे येवोत आपोआप
दूर होतात. "थमकर ना बैठ उठान अभी बाकी है , जमी खत्म हुई तो क्या असमा
अभी बाकी है" माझी मूळ नेमणूक ७/७/१९९७ आहे. आज ७/७/२०२२ ला पंचवीस वर्ष
पूर्ण झाली. आज माझ्या नोकरीचा रौप्य महोत्सव म्हटल तरी चालेल. मी ७ जुलैला पंचायत
समिती मंगळवेढा या ठिकाणी हजर झाले. त्या वेळी अशी परिस्थिती होती की मला मंगळवेढ्यातील
एकही गाव व शाळा माहित नव्हती. तरीही मला माझ्या घरापासून तीन किलो मीटर अंतरावरची
शाळा मिळाली. त्या शाळेचे नाव अगोदर शिंदे
वस्ती नाव होते त्यानंतर लक्ष्मीनगर हे नाव त्या शाळेला देण्यात आले. कुठली वस्ती शाळा कुठे आहे हे पण माहित नव्हत.
सगळे म्हणाले जावा तुमच्या घरापासून जवळच आहे. एस टी मध्ये बसून त्या वस्ती
शाळेजवळ उतरते. पण तिथ कुठ शाळाच दिसत नव्हती मला वाटल मी चुकीच्या ठिकाणी उतरले
पण समोरच्या एका झोप डीतून मुलांचे आवाज येत होते म्हणून त्या ठिकाणी गेले तर खरच
त्या झोपडीत शाळा भरली होती. तिथे शिकवणारे शिक्षक यांना मी माझी ऑर्डर दाखवली ते
म्हणाले हिच शाळा आहे थोड्या वेळा पूरत तर डोळ्यासमोर अंधारच झाला कारण झोपडी एकच
फळा व खुर्ची तर मोडकळलेल्या अवस्थेत आता दोघांनी या ठिकाणी कसे शिकवायचे हा मोठा
प्रश्न पण ते शिक्षक फार समजूतदार होते व वयस्कर पण होते. त्यांनी मला सांगितल
झोपडीत तू शिकव मी झाडाखाली शिकवतो म्हणाले.पहिल्या दिवसा पासून त्यांनी मला
त्यांची मुलगीच मानली. त्यांनी मला जगायच कस शिकवल प्रत्येक गोष्टीच नियोजन करायला
शिकवल. झोपडी मध्ये दोन वर्ष काढल्या नंतर १९९९ ला शाळेसाठी नविन इमारत मिळाली.
जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि
पाण्याची गरज आहे तेवढच जीवन जगताना स्पर्धक आणि
विरोधक यांची गरज आहे स्पर्धक सतत
आपल्याला गतीशील आणि क्रियाशिल बनवतात विरोधक कायम आपल्याला सर्तक आणि सावधान
बनवितात. हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला
कायम पोषक वातावरण तयार करतात. या दोघांना
निर्माण करायला तुम्हांला कष्ट करावे लागत नाही. समाज फुकटात तुंम्हाला देऊन
टाकतो. त्यांच्यावर चिडू नका त्यांचे कायम स्वागत करा त्यांच्या शिवाय तुमचे जगणे
अधूरे आहे.
चाहे कई बार गिरना पडे
सपनो को पुरा करना है
चाहे खुद से भी लडना पडे"
तसेच अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली
त्यामध्ये श्री संत दामाजी पतसंस्था संचालक पद, शिक्षक ध्येय उपसंपादिका, मराठीचे शिलेदार बहुउद्देशिय संस्था नागपूर यांचे सदस्या पद. आता पर्यंत
मिळालेल्या यशामध्ये माझे सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी, माझे कुटुंब या सर्वाच्या सहकार्यामुळेच
इथे पर्यत पोहचले आहे. असेच आपणा सर्वांचे
सहकार्या राहू दे .
"जमिनीवर राहून आकाशाला स्पर्श करता
येतो फक्त हातात कर्तुत्वाचा पतंग हवा"