संतोष बा. मनसुटे जि. प. शाळा रुधाना जि. बुलढाणा ५ सप्टेंबर चा दिवस उजाडला. राष्ट्रीय , राज्य , जिल्हा स्थरावरिल आदर्श शिक्षकांची नावे जाहीर झाली. आदर्श शिक्षक पुरस्कार हा आपले पुढल्या महिन्यात सेवानिवृत्त होत असलेले विठ्ठल सर यांना मिळावा अशी आंतरिक ईच्छा स्टाफ च्या सर्व शिक्षकांना वाटत होती.पण मला पुरस्कार मिळावा या करिता चढाओढ करावी , आणि मी कसा आदर्श आहे हे वरिष्ठांना पटवुन द्यावं आणि संभवता वशिलेबाजी करावी , हा विचार सरांच्या तत्वात बसत नव्हता. तेवढ्यात विठ्ठल सर आपल्या दुचाकी फटफटीने शाळेच्या आवारात दाखल झाले. फट फट फटऽऽऽ करित सरांची गाडी थांबली , तोच आमचे सर आलेऽऽ आमचे सर आलेऽऽ करित पंधरा वीस पोरांच्या गुचका सरांच्या जवळ आला. गुचका हा फुलांचा असतो अन ती मुलं फुलांसारखीच होती. सर मला हेल्मेट द्या , सर मी टिफीन बॅग घेतो , सर मी वर्ग झाडुन काढला , सर मी आपल्या वर्गातील जाळे काढले अशा प्रकारे एकेक विद्यार्थी आपापली कामे सरांना सांगत होता. सरांच हेल्मीट वर्गात नेवुन ठेवाव , बॅग न्यावी या करिता आपसात भांडत , मी ने...