मुख्य सामग्रीवर वगळा

कौशल्य विकास : कौशल्य शिक्षण: एक नवी पहाट

 


मधुकर घायदार, संपादक
नाशिक 9623237135

“भारतातील जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त युवक हे कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी नेमण्यास उपयुक्त नाही.” असे खळबळजनक पण धक्कादायक वाटणारे विधान इन्फोसिस कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नारायणमूर्ती यांनी केले. आसपास थोडीशी डोळसपणे नजर फिरविली तरी मूर्तींच्या म्हणण्यातील उव्दिग्नता आपल्या लक्षात येईल. आज देशातील ५० हजारांपेक्षा अधिक नोकऱ्या आवश्यक कुशल मनुष्यबळाअभावी पडून असल्याचा अहवाल एका अर्थविषयक मासिकाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. शिक्षण हा जीवनाचा अविभाज्य पाया समजला जातो. आयुष्याचे जवळपास २० टक्के दिवस आपण शिक्षण घेण्यामध्ये घालवतो, त्यानुसार नोकरी मिळते. ब्रिटीश शिक्षण पद्धतीमध्ये फक्त भाषा (इंग्रजी) आणि शास्त्र याविषयांवर भर होता. हळूहळू कौशल्य विकास शिक्षणातून लुप्त होत गेला. गेल्या पन्नास वर्षात शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानही वरवर दिले जाते. पदवीधर व्यक्तीचे ज्ञानही सखोल नसते आणि काही कौशल्य अंगी बाणलेले नसते. कमालीच्या पुस्तकी, साचेबंद, बदललेल्या मार्केट किंवा परिस्थितीच्या गरजांपासून आणि तरीही दिवसेंदिवस खर्चिक बनत चाललेल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेकडे पुस्तकी आणि ‘घोकलेल्या’ माहितीपलीकडे न जाऊ शकणारे आणि मुलभूत कौशल्याचा अभाव असणारे मनुष्यबळ आपली शिक्षणव्यवस्था ‘घाऊकपणे’ जन्मास घालत आहे. बदललेल्या बाजारपेठांच्या गुंतागुंतीच्या गरजांमध्ये ज्यांचा उपयोग काडीमात्र नाही. त्यामुळे फक्त १५ ते २० टक्के पदवीधर नोकरीयोग्य आहेत, असे अभिप्राय बऱ्याच कंपन्यांकडून मिळतात.

डॉ. मर्मर मुखोपाध्याय यांचं ‘Total Quality Management in Education’ हे पुस्तक गुणवत्तेचा विचार करणाऱ्या सगळयांनीच वाचलं असावं. त्यात अमेरिका, जपान यांसारख्या प्रगत देशांतील गुणवत्तेची संकल्पना मांडली गेली. आपणही असा विचार करावा असं कुणाकुणाच्या मनात आलं. आपणही त्याच संकल्पनेचं अनुकरण करावं का? जगभरात शिक्षणात बदल होतोय. हा बदल आपणही करायचं ठरवू या का? आपल्या देशाची विविध राज्यांतील विविध स्तरांतील स्थिती, गती समजून याची मांडणी करावी का? करायला हवी का? का जसंच्या तसं आपण 'राबवू या'? गुणवत्ता म्हणजे काय? म्हणजे आधी ती आहे असं गृहीत धरणं आणि मग शैक्षणिक गुणवत्तेचं व्यवस्थापन करणं असं घडायला हवं का? गुणवत्ता आहे असं कोणत्या निकषावर आपण ठरवणार आहोत? याचा विचार व्हायला हवा...

भारताला येत्या काळात सुमारे पाच कोटी व्यवसाय कौशल्य असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची विविध क्षेत्रात गरज आहे. एकटया महाराष्ट्रात ५० लाख व्यवसाय कौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाची गरज आहे. परंतु अशा कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाचा दुर्देवाने तुटवडा आहे.

कौशल्य विकास हा शिक्षणाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. यासाठी समाज आणि शिक्षण क्षेत्रात कौशल्य विकास म्हणून काय बदल करायचे यावर विचार करायला हवा.

        सध्या औद्योगिक मंदी आणि यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस नोकऱ्यांच्या संख्येत बदल होत आहे. औद्योगिक जगताच्या मागणीनुसार शैक्षणिक अभ्यासक्रम निश्चित करावा लागेल. नोकरी संदर्भात येणाऱ्या जाहिरातींची मागणी वेगळी असते आणि मुलांचे प्रशिक्षण वेगळे असते. असे चित्र दिसते. अंगी कौशल्य असले की स्पर्धेच्या युगातही रोजगाराच्या अनेक वाटा निर्माण होतात. त्यासाठी कौशल्य शिक्षणाची गरज आहे. प्रत्येक मुलाला आणि कोणत्याही मुलाला उत्तम ऐकता येणे, बोलता येणे, वाचता येणे आणि लिहिता येणे या माध्यमातून जगण्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा आत्मविश्वासपूर्वक निवडता येणे, यालाच गुणवत्तापूर्ण कौशल्यवर्धित शिक्षण म्हणता येईल. यात मुलांमधील कल्पकतेला वाव मिळणे, हाताने काही करण्याची उर्मी निर्माण होणे, उत्साहपूर्वक वातावरण असणे, निर्भयता अंगी येणे यांसारख्य अनेक गोष्टी येतात.

शिक्षण या शब्दाची व्याख्या, स्वरूप वेगळं असल्यामुळे पूर्वी जी मंडळी तथाकथित शिक्षणप्रवाहात नसली, तरी त्यांनी जे (अनेक क्षेत्रात) उभं केलं ते कदाचित त्या अर्थाने शिकलेली मंडळी करू शकत नाहीत असं लक्षात येतं. अनुभव संशोधन निर्मिती, नोंदी, भूमिका अशा अनेक गोष्टी या संदर्भात महत्त्वाच्या आहेत. पूर्वी विविध प्रकारची कौशल्य माणसाच्या अंगी होती. ती पुढील पिढीत देण्याची रचनाही समाजात होती. लहान मुलाला हिशोब पटकन करता येत होता. कागदच नव्हता, छपाई नव्हती तरी प्रचंड मुखोद्गततेच्या स्वरूपात लेखन झालं. हळूहळू वेगवेगळे लोक येत गेले. अनेक गोष्टी आम्ही स्वीकारल्या. यातून संस्कृती घडत गेली. लोककलातून ती साकारू लागली.

 नेमकी गडबड कुठे झाली? ब्रिटीश आले, येतांना त्यांचे शिक्षण घेऊन आले, जातांना ते ठेऊन गेले.




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक विकासामध्ये पालकांचे योगदान महत्त्वाचे

  श्रीमती खान तरन्नुम अब्बास जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर , ता. श्रीरामपूर, अहमदनगर मुलांच्या शैक्षणिक पायाभरणीत पालकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असून , बदललेल्या काळात तर योगदानाचे संदर्भही बदलले आहेत. उंचावलेल्या आर्थिक स्तरांमुळे अनेक घरांत सांस्कृतिक , सामाजिक व तांत्रिक बदल झालेले आहेत. एखादे शहर विकसित होताना त्या शहराची भविष्याची आव्हाने पेलणारी पुढची पिढी विकसित करायची असेल तर ही पिढी घडविणाऱ्या पालकांच्या पालकत्वाची चिकित्सा होणे आवश्यक आहे. आपल्याला एखादी पदवी मिळविण्यासाठी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. महाविद्यालयात जावे लागते , त्या विषयांच्या तासाला बसणे , क्रमिक पुस्तके वाचणे , संदर्भग्रंथ हाताळणे , परीक्षा देणे , ती उत्तीर्ण होणे हे सर्व टप्पे गाठावे लागतात. दुर्दैवाने पालक होण्यासाठी यापैकी काहीही करावे लागत नाही. शास्त्रशुद्ध अभ्यास , बालमानसशास्त्र , मेंदूच्या जडणघडणीचा प्रवास , लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रेरणा , नवनवीन ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमता , अनुकरणशीलता , संस्कार व मूल्य यांचा आयुष्यावर पडणारा प्रभाव , टीव्ही व मोबाइलचा ग्रहण...

‘महाराष्ट्र’ नाव कसे पडले?

  शिवकन्या एन. कदेरकर-कोंजारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळ , बालभारती , पुणे सदस्य व सहशिक्षिका मॉर्डन हायस्कूल , सोलापूर                          महाराष्ट्र या नावातच महानता दिसून येते महा मोठे महान असे हे राष्ट्र होय म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे ऐकताना किंवा गाताना अभिमानाने मान ताठ होते ऊर भरून येतो डोळ्यात एक चमक येते. संतांचा देश दऱ्याखोऱ्या आमचा देश शूरवीरांचा देश यासारख्या अनेक नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र कधी कसे पडले याबाबत मात्र अनेक विचार प्रवाह दिसून येतात. प्राप्त झालेले हे नाव लोक वाचत आहे की देश वाचक याबाबत ही प्रश्नचिन्हच आहे. इतिहासाचे अभ्यासक चि. वि. वैद्य यांच्या मते इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास दक्षिण भारतात गोपराष्ट्र ,   पांडुराष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती होत्या त्यातीलच मल्लराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. तसेच इतिहासाचे अभ्यासक रा. गो. भांडारकर यांच्या मते दक्षिणेतील रठ्ठ लोका...

सुखाची गुरुकिल्ली

  श्री. कांबळे एस. जी. पाटोदेकर जगी सर्व सुखी असा कोण आहे ,                                    विचारी मना तूची शोधूनी पाहे. या संत रामदास महाराजांच्या वचना प्रमाणे या जगात कोण सुखी आहे हे प्रत्येकाने आपापल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. याचाच अर्थ या जगात कोणीही सुखी नाही. सुखाचे मूळ हे प्रत्येकाच्या फक्त धनात नसून ते मनात आहे.फक्त आचारात नसून ते विचारात आहे.        ज्यांच्याकडे सुखाची गुरुकिल्ली आहे असा कोण आहे ? सुख म्हणजे नेमकं काय असतं ? सुख हे कोठे , केव्हा आणि कसे मिळते ? सुख मिळवण्यासाठी नेमकं काय करावे ? असे एक ना अनेक प्रश्न सर्वानाच पडले असतील , पडत असतील किंवा भविष्यात पडतील यात शंका नाही.  आज जर खऱ्या अर्थाने विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की , प्रत्येक माणूस हा दुःखी असो व नसो पण तो मात्र सुखाच्या शोधात नक्की भटकतो आहे. सुखासाठी वाटेल ते करण्याची त्याची ही धडपड अहोरात्र चालू आहे. सुखासाठी काय केले पाहिजे. काय केले म्हणजे ...