मुख्य सामग्रीवर वगळा

‘महाराष्ट्र’ नाव कसे पडले?

 


शिवकन्या एन. कदेरकर-कोंजारी

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व

अभ्यासक्रम संशोधन  मंडळ, बालभारती, पुणे सदस्य
व सहशिक्षिका मॉर्डन हायस्कूल
, सोलापूर


                    महाराष्ट्र या नावातच महानता दिसून येते महा मोठे महान असे हे राष्ट्र होय म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे ऐकताना किंवा गाताना अभिमानाने मान ताठ होते ऊर भरून येतो डोळ्यात एक चमक येते. संतांचा देश दऱ्याखोऱ्या आमचा देश शूरवीरांचा देश यासारख्या अनेक नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र कधी कसे पडले याबाबत मात्र अनेक विचार प्रवाह दिसून येतात. प्राप्त झालेले हे नाव लोक वाचत आहे की देश वाचक याबाबत ही प्रश्नचिन्हच आहे. इतिहासाचे अभ्यासक चि. वि. वैद्य यांच्या मते इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास दक्षिण भारतात गोपराष्ट्र,  पांडुराष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती होत्या त्यातीलच मल्लराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. तसेच इतिहासाचे अभ्यासक रा. गो. भांडारकर यांच्या मते दक्षिणेतील रठ्ठ लोकांनाच अशोकाच्या शिलालेखात "रास्टीक" म्हटलेले असून त्याचेच संस्कृत रूप "राष्ट्रीक" असे झाले. मौर्य सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात बौद्ध परिषदेचे आयोजन केले होते. याचा वृत्तांत आपणास श्रीलंकेत लिहिलेल्या महावंश या पाली ग्रंथात आढळतो त्यात महारठ्ठ असा येणारा उल्लेख हा महाराष्ट्राचाच असावा असे वाटते. महाराष्ट्र बद्दलचा महाराष्ट्र असा उल्लेख आढळणारा पुरातत्वीय लिखित पुरावा गुप्‍त व वाकाटक काळातील आहे हेरण या मध्य प्रदेशात असणाऱ्या ठिकाणी इसवीसन ३६५ सालचा सत्य नागाचा संस्कृत शिलालेख प्राप्त झाला त्यात तो स्वतः ला महाराष्ट्र 'प्रमुखेत' असा करतो. महाराष्ट्राच्या भूभागात साठी महारथी महारथी असे नावे वापरली जात होती. भरुची वातशहन भरत मुनी या ग्रंथात महाराष्ट्र हे नाव आढळते. नाणेघाटातील शिलालेखात इसवी सन पूर्व २०७ मध्ये मराहठी चा राजा वेदश्री होता असा उल्लेख आढळतो. रवी किर्ती च्या लेखात चालुक्य वंशीय दुसरा पुलकेशी हा तीन महाराष्ट्रावर राज्य करीत होता असा उल्लेख आढळतो. सातवाहन कालखंडातील शिलालेखात आपणास   'महारठी ' 'महारठीनी ' असे नाव आढळते.. पुढे याच प्राकृत रूपांतर महारठ्ठ झाले आणि पुढे महाराष्ट्र झाले असे काही विद्वान समजतात. महानुभावांच्या लीळाचरित्रात या प्रदेशांचे व येथील लोकांचे ' 'महाराष्ट्रीय विद्या आणि पुरुष' असे गुणगाण केलेले

आढळते.

        राजाराम शास्त्री भागवत यांच्या मते संस्कृत नाटकांमध्ये येणारा मरहट्ट जन वाचक शब्द मह्वठा या शब्दाची प्रकृती दिसते. वि का राजवाडे यांच्या मते महाराष्ट्र शब्दाची विभक्ती रट्ट या शब्दावरून झाली या शब्दाचे संस्कृत रूप म्हणजे राष्ट्रिक. म्हणजेच राष्ट्रात अधिकाराचे काम करणारा व्यक्ती होय वर्णाने क्षत्रिय व पिढीजात पेशाने असा या राष्ट्रात आमचा किंवा रस्त्यांचा दर्जा असे हजार-बाराशे वर्षांपूर्वी राष्ट्रीय काहून उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रिक किंवा असे म्हणत. मोठा किंवा महत्तर प्रांत म्हणजेच मोठे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय.

        एखाद्या प्रदेशाच्या सामाजिक सांस्कृतिक व राजकीय अस्मितेच्या जडणघडणीत विविध घटक जबाबदार असतात भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषा या परिमाणाच्या आधारावर राज्यांची निर्मिती केली गेली महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यामागे मराठी भाषा हा प्रमुख आधार होता. भाषा फक्त सध्या पण करत नाही तर संस्कृती संवर्धन व जतन ही करते. भाषा हे समाजाचे वेगळेपण प्रभावीपणे अधोरेखित करते    भारतासारख्या बहुभाषिक बहुधर्मीय भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने मोठ्या असणाऱ्या देशांची प्रशासनाच्या सोयीसाठी ज्यावेळी राज्याची निर्मिती करायचे ठरले त्यावेळेस भाषा हा एक

 आधार ठरविण्यात आला.

        महाराष्ट्र निर्मितीचे काही प्रमुख ठळक मुद्दे पुढील प्रमाणे...

  १) बंगालची फाळणी रद्द झाल्यानंतर १९११ मध्ये " मराठी भाषा बोलणार्‍यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी"  न चि केळकर त्यांनी आपले मत मांडले. इसवी सन १९४६ पासून मराठी भाषिक राज्याची मागणी 'संयुक्त महाराष्ट्र चळवळी' च्या माध्यमातून  सुरू झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निर्णय  १२ मे १९४६ रोजीच्या बेळगाव येथील साहित्य संमेलनात झाला.

२) संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेकरिता महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै १९४६ मध्ये महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये मुंबई मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा गोमंत अशा मराठी भाषिकांचा समावेश करण्यात यावा असा ठराव पारित करण्यात आला.

३) १० डिसेंबर १९४८ रोजी दार आयु गाणे आपला अहवालात असे सादर केले की भाषेच्या आधारे प्रांतिक रचना ही भारताच्या राष्ट्रीय हितसंबंध आस इष्ट नाही आणि आवश्यक की नाही. यासारख्या अनेक कारणांमुळे अनेक ज्येष्ठ नेते नाराज झाले आणि पुढे जे व्ही पी समिती नेमण्यात आली.

४) जवाहरलाल पंडित नेहरू, वल्लभ भाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या अध्यक्षरा वरून JVP जवप ही त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली

१ एप्रिल १९४९ रोजी या समितीने दार कमिशन प्रमाणेच आपला अहवाल सादर केला त्यामुळे पुन्हा नाराजीचा सूर सर्वत्र पसरला. त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आचार्य अत्रे यांनी मांडला व तो बहुमताने मंजूर झाला.

५) मराठी भाषेत मुंबई महाराष्ट्र वराड आणि नागपूर प्रदेशात काँग्रेस समित्यांची स्थापना झाली ताम्हणकर यांनी महाराष्ट्राचे तीन विभाग या लेखात मराठी भाषिकांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे असे सांगितले तर विनोबा भावे यांनीही महाराष्ट्रधर्म या लेखातून या कल्पनेचा पुरस्कार केला.

६)८ ऑगस्ट च्या अकोला करारानुसार महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि महाविदर्भ असे दोन उपप्रांतपाल असावेत असे सुचविण्यात आले.

७) २९ सप्टेंबर १९५३ रोजीचा नागपुर करारा च्या संयुक्त महाराष्ट्र स्थापन करारावर मराठवाडा विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.  " महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू " असे शंकरराव देव म्हणाले.

७) २२ डिसेंबर १९५३ रोजी राज्य पुनर्रचना समितीची घोषणा करण्यात आली या समितीला फाजल अली समिती असेही म्हटले जाते. पंडित हृदयनाथ कुंझरू आणि केएम पणीकर हे या समितीचे सदस्य होते. यामध्ये मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी या आयोगाने शिफारस केली होती.

८) ८ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. १९५६ ते १९६० या दरम्यान संयुक्त महाराष्ट्र समितीने अनेक कार्य केली.

९) द्विभाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती साठी केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी प्रयत्न केले महाराष्ट्र काँग्रेस मध्ये सत्तेसाठी संघर्ष अटीतटी ला पोहोचला पण गुजरातच्या पाठिंब्यावर यशवंतराव चव्हाण यांनी मुंबईच्या विधिमंडळाचे नेतृत्व मिळवले व १ नोव्हेंबर १९५६ रोजी मोठ्या द्विभाषिक राज्याची स्थापना होऊन यशवंतराव चव्हाण द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले व शेवटचे मुख्यमंत्री झाले.

१०) द्रीभाषिक राज्याचां प्रयोग शक्य नाही हे केंद्रीय नेतृत्वाला यशवंतराव चव्हाण यांनी व्यवस्थितरीत्या समजावून दिले त्यानुसार गुजरात व महाराष्ट्र अशी स्वतंत्र एक भाषी राज्य निर्माण करावी यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती आणि महागुजरात परिषद यांनी आपले कार्य केले.

        ४ डिसेंबर १९५९ रोजी विभा शकाचे विभाजन करण्याचा ठराव केला.

११) पंडित नेहरू नि मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला संमती दर्शवली त्यानुसार मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती हिरवा कंदील दाखविल्यावर संसदेत मुंबई राज्य पुनर्रचना विधेयक १९६० ला संमत करण्यात आले. १मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

१ मे हा दिवस कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो..

आपल्या सर्वांना महाराष्ट्र निर्मिती दिवसाच्या व कामगार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक विकासामध्ये पालकांचे योगदान महत्त्वाचे

  श्रीमती खान तरन्नुम अब्बास जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर , ता. श्रीरामपूर, अहमदनगर मुलांच्या शैक्षणिक पायाभरणीत पालकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असून , बदललेल्या काळात तर योगदानाचे संदर्भही बदलले आहेत. उंचावलेल्या आर्थिक स्तरांमुळे अनेक घरांत सांस्कृतिक , सामाजिक व तांत्रिक बदल झालेले आहेत. एखादे शहर विकसित होताना त्या शहराची भविष्याची आव्हाने पेलणारी पुढची पिढी विकसित करायची असेल तर ही पिढी घडविणाऱ्या पालकांच्या पालकत्वाची चिकित्सा होणे आवश्यक आहे. आपल्याला एखादी पदवी मिळविण्यासाठी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. महाविद्यालयात जावे लागते , त्या विषयांच्या तासाला बसणे , क्रमिक पुस्तके वाचणे , संदर्भग्रंथ हाताळणे , परीक्षा देणे , ती उत्तीर्ण होणे हे सर्व टप्पे गाठावे लागतात. दुर्दैवाने पालक होण्यासाठी यापैकी काहीही करावे लागत नाही. शास्त्रशुद्ध अभ्यास , बालमानसशास्त्र , मेंदूच्या जडणघडणीचा प्रवास , लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रेरणा , नवनवीन ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमता , अनुकरणशीलता , संस्कार व मूल्य यांचा आयुष्यावर पडणारा प्रभाव , टीव्ही व मोबाइलचा ग्रहण...

सुखाची गुरुकिल्ली

  श्री. कांबळे एस. जी. पाटोदेकर जगी सर्व सुखी असा कोण आहे ,                                    विचारी मना तूची शोधूनी पाहे. या संत रामदास महाराजांच्या वचना प्रमाणे या जगात कोण सुखी आहे हे प्रत्येकाने आपापल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. याचाच अर्थ या जगात कोणीही सुखी नाही. सुखाचे मूळ हे प्रत्येकाच्या फक्त धनात नसून ते मनात आहे.फक्त आचारात नसून ते विचारात आहे.        ज्यांच्याकडे सुखाची गुरुकिल्ली आहे असा कोण आहे ? सुख म्हणजे नेमकं काय असतं ? सुख हे कोठे , केव्हा आणि कसे मिळते ? सुख मिळवण्यासाठी नेमकं काय करावे ? असे एक ना अनेक प्रश्न सर्वानाच पडले असतील , पडत असतील किंवा भविष्यात पडतील यात शंका नाही.  आज जर खऱ्या अर्थाने विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की , प्रत्येक माणूस हा दुःखी असो व नसो पण तो मात्र सुखाच्या शोधात नक्की भटकतो आहे. सुखासाठी वाटेल ते करण्याची त्याची ही धडपड अहोरात्र चालू आहे. सुखासाठी काय केले पाहिजे. काय केले म्हणजे ...