सौ नूतन विनोद कामळे-मुळणकर
ता. नांदगाव, जि. नाशिक
उठावदार व्यक्तिमत्वाचे व्यक्ति ची संगत सगळयांनाच आवडत असते जर त्यांच्यात चांगले नैतिक गुण असतील, तर व्यक्ति माणुस म्हणूण सगळयांनाच हवहवसं वाटते.
व्यक्तिमत्व हा शब्द सामान्यपणे मनुष्य प्राण्याच्या संदर्भात वापरला जातो. दिसणे, वेशभूषा, वर्तन ह्यांच्या साहाय्याने दुस-यावर प्रभाव पाडणे. हा प्रभाव जितका अधिक तितके ते व्यक्तिमत्व प्रभावशाली मानले जाते. व्यक्तिचा ज्याप्रमाणे प्रभाव पडतो त्याचप्रमाणे समाजावर ही प्रभाव पडत असतो तर बघू व्यक्तिमत्व म्हणजे काय?
प्रत्येक व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाची परिभाषा प्रत्येक व्यक्ति आप-आपल्या मतानुसार मांडणार परंतु मानसशास्त्रांच्या दृष्टिकोणातून बघितल्यास कळते, की शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासातून जे व्यक्तिदेह घडत असते त्यास व्यक्तिमत्व म्हणतात. व्यक्तिच्या सुविकसित व्यक्तिमत्वामध्ये आचार, विचार आणि भावना या तिन्हींचा मेळ असतो. व्यक्तिच्या व्यक्तिमत्वात तिचे बाह्यरूप म्हणजेच शरीर रचना, मानसिक गुणांसारखे आंतरीक घटक आणि परिस्थितीशी समायोजन करण्याची पद्धती यांचा समावेश होतो किंवा आपण असं ही म्हणू शकतो, की अंतर्मुख-बहिर्मुख यांच्यात विकास घडवून स्वतःला समाजासमोर सादर करण्याची कला किंवा पद्धत म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय.
व्यक्ति हा स्वतःच व्यक्तित्व स्वतः घडवितो त्यानंतर त्याचे रूपांतर व्यक्तिमत्वात करित असतो. समाजात आपली छाप पाडण्यासाठी व्यक्तिमत्व विकास करणे खूप गरजेचे आहे.
आपल्या अवती-भवतीच्या लोकांचाही परिणाम आपल्या प्रगतीवर, आयुष्यावर होत असतो म्हणूणच चांगल्या विचारांचे व्यक्तिमत्व अर्जित केलेल्या व्यक्ति सोबत च जवळकी साधावी चांगले गुण, चांगली संगत जीवनात समाविष्ट करावे. आपले विचार, कर्म आपले भाग्य लिहीत असतात. ह्या सगळया गोष्टींचा विचार विनिमय करूनच त्यानुसार व्यक्तिमत्वाच विकास घडवावा.
प्रत्येक व्यक्ति ही निसर्गाची अद्भुत कलाकृती आहे, त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वतःला कमी लेखण्यापेक्षा स्वतःमध्ये सातत्यने सुधार कसा होईल याचा प्रयत्न केलाच पाहिजे. या सृष्टितील रचलेल्या प्रत्येक जीवात्मा मध्ये त्रृटी आणि उणिवा आहेत कुणीच श्रेष्ठ नाही ही बाब लक्षात ठेवून स्वतःची कल्पनाशक्ति जागृत करा आणि ती वाढवा. तुमचे चांगले उठावदार व्यक्तिमत्व सगळया विश्र्वाला दिसू दया.