मुख्य सामग्रीवर वगळा

वटसावित्री पौर्णिमा

 


श्रीमती गायत्री सुभाष पाटील

जि. प. शाळा वडगाव ( ह)

ता. पाचोरा जि.जळगाव

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

     वट मुले स्थितो ब्रम्हा वटमध्ये जनार्दन !

वटाग्रे तू शिव देव:सावित्री वटसंमिश्रीता!

  या संस्कृत श्लोकात वडाच्या झाडाचे  व सावित्रीचे महत्त्व प्रदान केले आहे.

       ज्येष्ठ महिना हा नावाप्रमाणेच सर्व ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा हा महिना आहे. ऋतुचक्रातील सर्वात मोठा दिवस याच महिन्यात असतो. हा महिना तसा गंभीर, शांत आणि संयमी ग्रीष्माची चाहूल लागलेली आभाळ भरून आलेले. त्यामुळे वातावरणात उष्मा वाढला. मध्येच पावसाची हलकी सर येणार्‍या पावसाळ्याची आठवण करून देतो आणि पावसाळ्यात 'फ्युजन' म्हणजे हा महिना. निरोप घेणारा उन्हाळा  नि सुरू होणारा पावसाळा यांची गळाभेट या महिन्यात पाहता येते अशा या स्वप्नील वातावरणालाच धार्मिक अधिष्ठान नाही लाभले आहे.

        या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या दरम्यान विवाहीत स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. निसर्गाताच दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीत स्वीकारली आहे. एखाद्या जातीचा व्रुक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी लग्न केलं व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू-सासर्‍यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने तिचा पती सोडून दिला तिने वर मागण्‍यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले‌‌. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले ही झाली वटपौर्णिमेची पौराणिक कथा.

वटपौर्णिमेला धार्मिक महत्त्व तर आहेच पण त्यामागे वैज्ञानिक महत्त्वही समजून घेणे महत्त्वाचे आहे

वास्तविक शास्त्रकारांनी अनेक सण-उत्सव यांची रचना त्यामागील वैज्ञानिक संदर्भ लक्षात घेऊन केली असावी असे वाटण्याइतपत या सणामागे विज्ञान आहे दुर्दैवाने ते जाणून न घेता केवळ परंपरा म्हणून ते करण्याचा अट्टाहास धरला तर मग शास्त्रार्थ जाऊन त्याला कर्मकांडाचे स्वरूप येते.

वटपौर्णिमेचे ही तसेच आहे. सत्यवानाला यमाकडून परत मिळविण्या साठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते त्यामुळे या महिन्यात सर्व सौभाग्यवती स्रीया सौभाग्य रक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात.

सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रियभाषिनी!

ते सत्येन मा पाहि दुःख संसार सागरात

अवियोगो यथा देव सावित्र्या सहीत्स ते

अवियोगो तथास्माक भुयात जन्मनि जन्मनि

वटमुले स्थितो ब्रम्हा वटमध्ये जनार्दन

वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता

या प्रार्थनेतून सौभाग्यवती स्त्रिया वडाचे व सावित्रीचे गुणगान गातात.

        वटवृक्ष हा शिवरूपी आहे.शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्‍वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल तर शक्‍ती व शिव यांच्या संयुक्‍त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.

    वट व्रुक्षा सारख्या खोडाच्या उभ्या छेदा वर असणार्‍या सुख लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात. हे झाले वडाच्या झाडा मागील पूजा करण्याचे वैज्ञानिक महत्व

     याचप्रमाणे या प्रथा मागचा शास्त्रार्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. वड ही उपयुक्त वनस्पती आहे डेरेदार अशा या वटवृक्षाच्या आजूबाजूला एक दुनिया वावरत असते व त्यामुळे ऊन-पावसापासून आपले संरक्षण होते तापत्या उन्हातून जाणारा पांथस्थ वडाखाली थांबतो तेव्हा त्याचा सारा क्षीण नाहीसा होतो. वडाच्या डोल्यांमधून कावळे, घार गिधाड यांच्यासह चिमणी पाखरे पोपट आधी पक्षीही राहतात.

         वडाची बारीक बारीक फळे हे त्या पक्ष्यांचे अन्न आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व या झाडावरच अवलंबून आहे त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडणार्‍या बियांमुळे परागीभवनाचे ज्येष्ठ काम होते झाडांच्या बिया अन्य ठिकाणी रुजून पर्यावरण संवर्धनास पक्षांची मदत होते .परिसरात वडाच्या झाडाचे अस्तित्व असणे हे त्या परिसराचा पर्यावरण समतोल असल्याचे द्योतक आहे

    वडाच्या पारंब्या जमिनीत रुजून नवीन झाड तयार होते. त्यामुळे दाट झाडी तयार होऊन त्याखाली लहान वनस्पती वाढू शकतात. कमी ऊन मिळणार्या भागात या प्रकारच्या वनस्पती वाढतात. वेलींना आधार मिळतो. खाली पडलेल्या कुजलेला पालापाचोळा यापासून नैसर्गिक जैविक खत मिळते. वडाची मुळी खुप खोलवर पसरलेली असतात. त्यांची माती धरून ठेवण्याची क्षमताही चांगली असते त्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते. वडाचे झाड जंगलात असणे हे त्या जंगलाच्या संपन्नतेचे लक्षण आहे.

  त्यामुळेच आपल्याकडच्या कितीतरी वनरायांमध्ये वडाच्या झाडाचे प्रमाण लक्षणीय आहे. वडाचे बरेच औषधी उपयोगही आहेत. वडाच्या मुळांपासून निघणारे तेल केशवर्धक तर आहेच पण वीर्यवर्धक म्हणूनही त्याचा उपयोग होतो. पुरुषांच्या पुष्कळशा व्याधींवर आयुर्वेदात या गोळ्यांचा उपयोग केलेला आढळतो. ह्रदय रोगावर वडाच्या मुळांचा उपयोग होतो. त्यामुळे या वृक्षाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी त्याला पूजेचा मान देऊन त्याचा गौरव केला आहे.

 आधुनिक सावित्री नि कर्मकांडापेक्षा या सणामागील वैज्ञानिक महत्त्व जाणून घेऊन जर निसर्ग समतोलासाठी पर्यावरण संतुलनासाठी आपल्या या उपासनेचा, श्रद्धेचा भक्तीचा उपयोग केला तर पुढच्या पिढ्यांना याचा खूप उपयोग होईल. आणि आपल्या कर्माचा नक्कीच आपल्या जीवनावर चांगला परिणाम होईल.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक विकासामध्ये पालकांचे योगदान महत्त्वाचे

  श्रीमती खान तरन्नुम अब्बास जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर , ता. श्रीरामपूर, अहमदनगर मुलांच्या शैक्षणिक पायाभरणीत पालकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असून , बदललेल्या काळात तर योगदानाचे संदर्भही बदलले आहेत. उंचावलेल्या आर्थिक स्तरांमुळे अनेक घरांत सांस्कृतिक , सामाजिक व तांत्रिक बदल झालेले आहेत. एखादे शहर विकसित होताना त्या शहराची भविष्याची आव्हाने पेलणारी पुढची पिढी विकसित करायची असेल तर ही पिढी घडविणाऱ्या पालकांच्या पालकत्वाची चिकित्सा होणे आवश्यक आहे. आपल्याला एखादी पदवी मिळविण्यासाठी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. महाविद्यालयात जावे लागते , त्या विषयांच्या तासाला बसणे , क्रमिक पुस्तके वाचणे , संदर्भग्रंथ हाताळणे , परीक्षा देणे , ती उत्तीर्ण होणे हे सर्व टप्पे गाठावे लागतात. दुर्दैवाने पालक होण्यासाठी यापैकी काहीही करावे लागत नाही. शास्त्रशुद्ध अभ्यास , बालमानसशास्त्र , मेंदूच्या जडणघडणीचा प्रवास , लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रेरणा , नवनवीन ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमता , अनुकरणशीलता , संस्कार व मूल्य यांचा आयुष्यावर पडणारा प्रभाव , टीव्ही व मोबाइलचा ग्रहण...

‘महाराष्ट्र’ नाव कसे पडले?

  शिवकन्या एन. कदेरकर-कोंजारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळ , बालभारती , पुणे सदस्य व सहशिक्षिका मॉर्डन हायस्कूल , सोलापूर                          महाराष्ट्र या नावातच महानता दिसून येते महा मोठे महान असे हे राष्ट्र होय म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे ऐकताना किंवा गाताना अभिमानाने मान ताठ होते ऊर भरून येतो डोळ्यात एक चमक येते. संतांचा देश दऱ्याखोऱ्या आमचा देश शूरवीरांचा देश यासारख्या अनेक नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र कधी कसे पडले याबाबत मात्र अनेक विचार प्रवाह दिसून येतात. प्राप्त झालेले हे नाव लोक वाचत आहे की देश वाचक याबाबत ही प्रश्नचिन्हच आहे. इतिहासाचे अभ्यासक चि. वि. वैद्य यांच्या मते इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास दक्षिण भारतात गोपराष्ट्र ,   पांडुराष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती होत्या त्यातीलच मल्लराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. तसेच इतिहासाचे अभ्यासक रा. गो. भांडारकर यांच्या मते दक्षिणेतील रठ्ठ लोका...

सुखाची गुरुकिल्ली

  श्री. कांबळे एस. जी. पाटोदेकर जगी सर्व सुखी असा कोण आहे ,                                    विचारी मना तूची शोधूनी पाहे. या संत रामदास महाराजांच्या वचना प्रमाणे या जगात कोण सुखी आहे हे प्रत्येकाने आपापल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. याचाच अर्थ या जगात कोणीही सुखी नाही. सुखाचे मूळ हे प्रत्येकाच्या फक्त धनात नसून ते मनात आहे.फक्त आचारात नसून ते विचारात आहे.        ज्यांच्याकडे सुखाची गुरुकिल्ली आहे असा कोण आहे ? सुख म्हणजे नेमकं काय असतं ? सुख हे कोठे , केव्हा आणि कसे मिळते ? सुख मिळवण्यासाठी नेमकं काय करावे ? असे एक ना अनेक प्रश्न सर्वानाच पडले असतील , पडत असतील किंवा भविष्यात पडतील यात शंका नाही.  आज जर खऱ्या अर्थाने विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की , प्रत्येक माणूस हा दुःखी असो व नसो पण तो मात्र सुखाच्या शोधात नक्की भटकतो आहे. सुखासाठी वाटेल ते करण्याची त्याची ही धडपड अहोरात्र चालू आहे. सुखासाठी काय केले पाहिजे. काय केले म्हणजे ...