मुख्य सामग्रीवर वगळा

सृष्टीची निर्मिती कशी झाली?

 


कु मंजू अ.वानखडे (स.शि)

म.न.पा. शाळा क्र १८ प्रविणनगर अमरावती 


विष्णू पुराणाचा संदर्भ घेता असे लक्षात येते कि ब्रह्मदेवाच्या उत्पत्ती नंतर ब्रह्मदेवांनी प्राकृत सृष्टी निर्माण केली. यात तम, मोह, अंधतमिस्त्र ही तमोमय सृष्टी निर्माण झाली. त्यानंतर बाह्य विषयाचे सुखादिक व आंतर विषयाचे ज्ञान नसलेली स्थावर सजीव सृष्टी निर्माण झाली. यात सर्वप्रथम वृक्ष, वेली, डोंगर, तळी, सागर, दगड यांची निर्मिती झाली. त्यानंतर पशू, पक्षी,सरपटणारे प्राणी, जलचर यांची निर्मिती झाली. यानंतर वैकृत व उर्ध्वस्त्रोत सृष्टी ज्यामधे सुखाची लालसा असणारे ज्ञानी व सात्विक लोकांचा समावेश होता. म्हणजेच मनुष्य सृष्टी निर्माण झाली.यालाच अर्वाक सृष्टी असे म्हंटले गेले आहे.मनुष्य सृष्टी मधे मग सात्विक, तामस, राजस वृत्तींचा समावेश झाला. यात सात्विक व तामस वृत्तींचा समावेश अनुग्रह सृष्टीत होऊन शेवटी कौमार सृष्टीची स्थिर सृष्टी निर्माण झाली. सृष्टीवर मानवाच्या जीवनाला सुरवात झाली.         

           विष्णूपुराणातील सृष्टीची निर्मिती याबाबत माहिती घेतांना काही ठिकाणी सृष्टीची निर्मितीबाबत ॠषिमुनींनी अशीही माहिती लिहून ठेवलेली आढळते कि हजारो वर्षापूर्वी सृष्टी निर्माण करण्यास काहीच नव्हते तेव्हा हिरण्यगर्भ तयार झाले. हे हिरण्यगर्भ म्हणजे उच्च तापमान धारण करणारा अणू रेणू होय. हिरण्यगर्भ म्हणजे उच्च तापमान असलेला पदार्थ जो उच्च तापमानामुळे सोन्यासारखा दिसतो. म्हणूनच त्याला हिरण्यगर्भ म्हंटले गेले.

        पंचमहाभूतांचा उल्लेख अतिप्राचीन काळापासून आढळतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणजे अवकाश पोकळी होय. आप म्हणजे पाणी. सुरुवतीला अवकाश पोकळीत वायू संचार होऊन कमी जास्त दाब निर्माण झाला व अणू तयार झाला. हळूहळू अणूला वायुमुळे गती प्राप्त झाली व तो अधिकाधिक तप्त होत जाऊन त्याची धारण क्षमता धारण क्षमतेपेक्षा जास्त होत गेली व स्फोट झाला व सृष्टीची निर्मिती झाली. यानंतर ॠषिमुनींनी प्रतिसृष्टी निर्मितीचा प्रयोग केला. सृष्टीच्या उत्पत्तीबाबत असाही उल्लेख काही ठिकाणी वाचनात येतो.

प्रत्येक धर्मग्रंथात सृष्टीची निर्मितीच्या वेगवेगळ्या कल्पना मांडलेल्या आहेत. ग्रंथनिर्मिती करणा-या प्रत्येक ग्रंथकाराच्या प्रतिभेच्या उदात्त कल्पना शक्तीचा अविष्कार या सृष्टी निर्मिती बाबत

वाचन केल्यास अवर्णनीय ठरतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पण सृष्टीच्या निर्मिती बाबत वेगवेगळ्या कल्पना असल्या तरी संशोधनाअंती काही गोष्टींची सत्यता नक्कीच पटते.

सर्वप्रथम जेंव्हा हा वायूगोळा विस्फ़ोट होऊन थंड झाला तेव्हा पृथ्वी व सूर्यामधल अंतर कमी असल्याने पाणी व सागर निर्माण झाले. भूकंपामुळे खनिजांचे थर तयार होऊन खडक बनले.खनिजांचे थर साचून पहाड बनले व उंच सखल जमीन तयार झाली. अडीच कोटी वर्षांपूर्वी ही निर्मिती झाली असून सर्वप्रथम पृथ्वीच्या वातावरणातील बदलामुळे एकपेशीय अमीबाची निर्मीती झाली.  त्यानंतर स्थलचर प्राण्यांची उत्पत्ती झाली. 'लामार्कच्या विकासवादी' सिद्धांताप्रमाणे विकासाच्या दृष्टीने बदल घडत गेले. निसर्गातील बदल व अपघातांमुळे नवनवीन प्राण्यांची निर्मिती होत गेली आणि हळूहळू निसर्गाशी समतोल राखणा-या गोष्टी निर्मिती होऊन टिकू लागल्या. न टिकणा-या गोष्टींचा -हास होत गेला. निसर्गाशी समतोल न जुळणारे जीव नामशेष झाले.उदा. डायनासोर्स. निसर्गाशी समतोल साधाभारी निसर्गाच्या सान्निध्यात जाणारी माकड, वानर अशी दोन पायांवर चालणारी प्राण्यांची निर्मिती झाली.. सहेलँन्थ्रोपस प्रजातिपासून तर होमो सानियाने पर्यंत  मानव उत्पत्तींचा टप्पे पार करत आज सर्वात बुद्धीमान प्राणी म्हणून जगतो आहे. पिअर लुईस मोरो द मिनिट्स यानेव उत्क्रांतचा प्रथम सिद्धांत मांडला.चार्ल्स डार्विनने नैसर्गिक निवडीनंतर आधारीत उत्क्रांती सिद्धांत मांडला. याकरता त्याने तीन प्रमुख स्त्रोतांचा आधार घेतला.ते म्हणजे नैसर्गिक निवड दुसरा सर चार्ल्सचा भूगर्भ सिद्धांत व तिसरा टोमस मॅल्सनचा लोकसंख्यावाढीचा सिद्धांत याचा अभ्यास करून निष्कर्ष काढले.'"ओरिजिनल ऑफ स्पॅनिश" यात डार्विनने प्राणीशास्त्र, निसर्ग, पर्यावरण याचा व उत्क्रांतीचा सहसंबंधाचा उहापोह केलेला आहे. उत्क्रांती म्हणजे ग्रामविकास. जीवसृष्टीत होत राहणारे बदल प्रक्रिया यातून लाखो वर्षाच्या कालावधीनंतर अभिप्रेत प्राणी, वनस्पती, जीवसृष्टी  उत्पन्न झाली.

         एकंदरीत जीवनातील बदल व पर्यावरणाचे अनुकूलन जेव्हा साधले जाते तेव्हा सृष्टीचा समतोल राखला  जातो हे मानवाने लक्षात घेणे महत्वाचे ठरते. वसुंधरा वाचली तर जीवसृष्टी वाचेल मानव जगेले हे त्रिकालबाधित सत्य स्वीकारणे गरजेचे असून वेळीच सावध होणे गरजेचे आहे हा मूळ गाभा. केवळ आध्यात्मिक कल्पनेवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक भौगोलिक संशोधन, सिद्धांत अभ्यासातूनही पर्यावरण, सृष्टीचे नियमन अबाधित राखणे मानवी जीवन टिकण्यासाठी किती महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन काळाची गरज ओळखून माझ्यापासून वसुंधरेचे रक्षण कसे करता येईल हा विचार करणे अगत्याचे ठरते.

 

घेऊनिया व्रत रक्षण वसुंधरा

जागऊ मानवी जीवन संवेदना..


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक विकासामध्ये पालकांचे योगदान महत्त्वाचे

  श्रीमती खान तरन्नुम अब्बास जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर , ता. श्रीरामपूर, अहमदनगर मुलांच्या शैक्षणिक पायाभरणीत पालकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असून , बदललेल्या काळात तर योगदानाचे संदर्भही बदलले आहेत. उंचावलेल्या आर्थिक स्तरांमुळे अनेक घरांत सांस्कृतिक , सामाजिक व तांत्रिक बदल झालेले आहेत. एखादे शहर विकसित होताना त्या शहराची भविष्याची आव्हाने पेलणारी पुढची पिढी विकसित करायची असेल तर ही पिढी घडविणाऱ्या पालकांच्या पालकत्वाची चिकित्सा होणे आवश्यक आहे. आपल्याला एखादी पदवी मिळविण्यासाठी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. महाविद्यालयात जावे लागते , त्या विषयांच्या तासाला बसणे , क्रमिक पुस्तके वाचणे , संदर्भग्रंथ हाताळणे , परीक्षा देणे , ती उत्तीर्ण होणे हे सर्व टप्पे गाठावे लागतात. दुर्दैवाने पालक होण्यासाठी यापैकी काहीही करावे लागत नाही. शास्त्रशुद्ध अभ्यास , बालमानसशास्त्र , मेंदूच्या जडणघडणीचा प्रवास , लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रेरणा , नवनवीन ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमता , अनुकरणशीलता , संस्कार व मूल्य यांचा आयुष्यावर पडणारा प्रभाव , टीव्ही व मोबाइलचा ग्रहण...

‘महाराष्ट्र’ नाव कसे पडले?

  शिवकन्या एन. कदेरकर-कोंजारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळ , बालभारती , पुणे सदस्य व सहशिक्षिका मॉर्डन हायस्कूल , सोलापूर                          महाराष्ट्र या नावातच महानता दिसून येते महा मोठे महान असे हे राष्ट्र होय म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे ऐकताना किंवा गाताना अभिमानाने मान ताठ होते ऊर भरून येतो डोळ्यात एक चमक येते. संतांचा देश दऱ्याखोऱ्या आमचा देश शूरवीरांचा देश यासारख्या अनेक नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र कधी कसे पडले याबाबत मात्र अनेक विचार प्रवाह दिसून येतात. प्राप्त झालेले हे नाव लोक वाचत आहे की देश वाचक याबाबत ही प्रश्नचिन्हच आहे. इतिहासाचे अभ्यासक चि. वि. वैद्य यांच्या मते इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास दक्षिण भारतात गोपराष्ट्र ,   पांडुराष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती होत्या त्यातीलच मल्लराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. तसेच इतिहासाचे अभ्यासक रा. गो. भांडारकर यांच्या मते दक्षिणेतील रठ्ठ लोका...

सुखाची गुरुकिल्ली

  श्री. कांबळे एस. जी. पाटोदेकर जगी सर्व सुखी असा कोण आहे ,                                    विचारी मना तूची शोधूनी पाहे. या संत रामदास महाराजांच्या वचना प्रमाणे या जगात कोण सुखी आहे हे प्रत्येकाने आपापल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. याचाच अर्थ या जगात कोणीही सुखी नाही. सुखाचे मूळ हे प्रत्येकाच्या फक्त धनात नसून ते मनात आहे.फक्त आचारात नसून ते विचारात आहे.        ज्यांच्याकडे सुखाची गुरुकिल्ली आहे असा कोण आहे ? सुख म्हणजे नेमकं काय असतं ? सुख हे कोठे , केव्हा आणि कसे मिळते ? सुख मिळवण्यासाठी नेमकं काय करावे ? असे एक ना अनेक प्रश्न सर्वानाच पडले असतील , पडत असतील किंवा भविष्यात पडतील यात शंका नाही.  आज जर खऱ्या अर्थाने विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की , प्रत्येक माणूस हा दुःखी असो व नसो पण तो मात्र सुखाच्या शोधात नक्की भटकतो आहे. सुखासाठी वाटेल ते करण्याची त्याची ही धडपड अहोरात्र चालू आहे. सुखासाठी काय केले पाहिजे. काय केले म्हणजे ...