मुख्य सामग्रीवर वगळा

व्यवसाय मार्गदर्शन: फोटोग्राफी

 


    आजच्या काळात फोटोग्राफी हा प्रत्येकाचा आवडीचा विषय बनलेला आहे. प्रकाश-संवेदी वस्तुंद्वारे प्रकाश किंवा विद्युतचुंबकीय उत्सारणाची नोंद करुन टिकाऊ प्रतिमा निर्माण करण्याच्या पद्धतीला फोटोग्राफी म्हणजेच छायाचित्रण असे म्हणतात. खरे तर छायाचित्रण ही एक इतिहास जपून ठेवणारी एक अजरामर कला आणि शास्त्र आहे, ती छायाचित्रकार, त्यासाठी वापरलेला कॅमेरा, छायाचित्रकाराचा दृष्टीकोन आणि वेळ आदी गोष्टींवर अवलंबून असते. छायाचित्रकाराला या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानही अवगत करणे आवश्यक आहे.

फोटोग्राफी ही अशी कला आहे जी आपल्या डोळ्यांना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देते. आपण फोटो काढत असताना त्या गोष्टीशी एक भावनिक बंध निर्माण करत असतो. फोटो हे नेहमी बोलके असावेत त्यांच्याशी आपला संवाद व्हायला हवा. एक योग्य आणि सुंदर छायाचित्र संपूर्ण घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो. छायाचित्रण करत असताना त्यातून आपल्याला जे दाखवायचे आहे ते सरळ आणि साधे पाने असायला हवे. फोटोग्राफी हे एकमेव माध्यम आहे की त्यात भाषेची आवश्यकता नसते. या क्षेत्रात शब्दापेक्षा प्रतिमेचा अधिक प्रभाव पडत असतो. एक छायाचित्र अनेक शब्दांची गरज भागवते. आजकाल सर्वच क्षेत्रामध्ये फोटोग्राफीचा वापर केला जातो. त्यात प्रामुख्याने चित्रपट उद्योग, प्रिंटींग व्यवसाय, जाहिराती, विविध उत्पादन, कला, मनोरंजन या क्षेत्रांचा समावेश होतो.

फोटोग्राफी ही अशी कला आहे की ज्यात आजही आपल्याला उज्ज्वल करियर करण्याची संधी आहे, त्यासाठी आपल्याकडे हवे एक चांगली दृष्टी आणि या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान.



फोटोग्राफी हे एक क्रिएटीव्ह माध्यम असल्याने त्यासाठी विशेष पात्रतेची आवश्यकता नसते. मात्र नवीन पाहण्याची दृष्टी असायला हवी. 

फोटोग्राफीच्या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पाहिजे. आजकाल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतदेखील विद्यार्थ्याना फोटोग्राफी शिकविली जाते. भारतात फोटोग्राफीचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था असून त्यात फोटोग्राफीतील पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात छायाचित्रकाराला पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्याक्षिकांवर भर दिलेला असतो.

 सध्या जाहिरात, पत्रकारीता फॅशनसोबतच मॉडेलींग क्षेत्रात फोटॉग्राफीचे क्षेत्र कमालीचे विस्तारले आहे. त्यामुळे या क्षेत्रात होतकरू युवकांसाठी मोठ्या प्रमाणात करियरच्या संधी उपलब्ध आहेत. 

कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफर- कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफर हा एखाद्या संस्थेसाठी कार्यरत असतो. गृहपत्रिका, जाहिराती, यंत्राचे छायाचित्रे काढणे आदी कामांचा यात समावेश होतो. आपल्या उत्पादनाविषयी आकर्षक छायाचित्राच्या माध्यमातून लोकांना अवगत, आकर्षित करणे हे कमर्शियल फोटॉग्राफरचे मुख्य काम असते. 

प्रेस फोटोग्राफर- प्रेस फोटोग्राफर म्हणजेच 'फोटो जर्नलिस्ट'. प्रेस फोटॉग्राफर स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र, मासिके तसेच वृत्तसंस्थेसाठी कार्यरत असतात. पत्रकाराप्रमाणे प्रेस फोटोग्राफरलाही महत्त्व आहे. त्यासाठी त्याला कमी वेळात उत्कृष्ट क्षण टिपण्याचे कौशल्य हवे. 

फीचर फोटोग्राफर- एखादी कथा, कविता, लेख आदी छायाचित्राच्या माध्यमातून सादर करण्याची कला फीचर फोटोग्राफरच्या अंगी असली पाहिजे. यात त्याला संबंधित विषयाचे सखोल ज्ञान आवश्यक असते. फीचर फोटोग्राफी क्षेत्रात अनेक विषयांचा समावेश होतो. 

जाहिरात फोटोग्राफर- जाहिरात एजन्सीमधील फोटोग्राफर हे बाजारात येणाऱ्या नवीन उत्पादन लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करतात. एखाद्या उत्पादनाच्या लोकप्रियेतेमागे खरे कौशल्य हे त्या जाहिरात फोटोग्राफरचे असते.

फॅशन फोटोग्राफर - फोटोग्राफी क्षेत्रात फॅशन फोटॉग्राफीची मोठी क्रेझ आहे. फॅशन क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. स्मार्ट वर्क आणि चांगली मिळकत तसेच स्वत:चे नाव होण्यासाठी तरूण-तरूणी मोठ्या संख्येने 'फॅशन फोटोग्राफी' हे क्षेत्र करियर म्हणून निवडतात. तसेच फॅशन हाउस, डिझायनर, फॅशन मासिके, वर्तमानपत्रे, खाजगी वाहिनी येथेही फॅशन फोटॉग्राफरला मागणी असते. 

याचप्रमाणे पोर्टेट फोटॉग्राफी, पोर्टफोलिओ फोटॉग्राफी, वेडींग फोटॉग्राफी, नेचर वाईल्डलाईफ फोटॉग्राफी, फॉरेंन्सिक फोटॉग्राफी, डिजिटल फोटॉग्राफी, फाईन आर्ट्स फोटॉग्राफी, ट्यूरिष्ट फोटोग्राफी या विविध प्रकारातही युवक आपले करिअर करून उत्तम अर्थार्जन करू शकता. तसेच युवक स्वतःचा स्टुडीओ देखील सुरु करू शकतो.

मधुकर घायदार

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर, नाशिक 

मोबा९६२३२३७१३५ 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मूल्यवर्धन: काळाची गरज

  आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.   देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी. परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची. आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना. प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावन...

साप्ताहिक शिक्षक ध्येय

  साप्ताहिक शिक्षक ध्येय वर्ष ३ रे; अंक २१ वा; १९ सप्टेंबर २०२२ सोमवार विशेष: राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक श्री. प्रकाश भिमराव हेडाऊ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ईटान 2, केंद्र मोहरणा, ता. लाखांदूर, जि. भंडारा यांचा पारितोषिक प्राप्त उपक्रम - बांधावरची शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम वाचायला विसरु नका... सोबत : ★ एकटेपणा : एक गंभीर समस्या ; प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, नागपूर ★ वाचन: काळाची गरज; श्री. डी. जी. पाटील, नंदुरबार ★ मासिक पाळी: समज-गैरसमज; श्रीमती मीरा मनोहर टेके, औरंगाबाद ★ मास्तर ते सर : एक प्रवास ; सौ. भारती सावंत, मुंबई ★ शिक्षक:  समाज परिवर्तनाचे माध्यम; कु. प्रतिभा चांदुरकर, अमरावती ★ माझा शैक्षणिक प्रवास; साईनाथ फुसे, औरंगाबाद ★ इन सब 'में' कहा? प्रियदर्शनी मौदेकर, नागपूर ★ याशिवाय कविता, डिजिटल साक्षरता, नोकरीच्या जाहिराती, विद्यार्थ्यांची रंगविलेली चित्रे, रांगोळी, डिजिटलचा आविष्कार, नवी उमेद-नवी भरारी, नवी आशा - नवी दिशा, मेंदूला खुराक, थोडं हसा बरं, ग्राफीटी, सप्ताहातील फोटो, बालचित्रकला, नोकरीचा राजमार्ग आदी अनेक वाचनीय सदरे... _★ शिक्षक ध्येय वाचायला विसरु नका.....

व्यवसाय मार्गदर्शन : मोबाईल टेक्निशियन

     मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर बदलत आहे. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईल धारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन , जोडणी , वितरण , विक्री पश्चात सेवा आदींच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यात कुशल यांत्रिक मनुष्यबळाची गरज बघता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र युवकांना लाभदायी ठरणारे अखंड सुरु राहणारे क्षेत्र आहे. म्हणून मोबाईल दुरुस्ती हा सद्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध नाही. डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विविध संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी तीन महिने , सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात येतो.      आज मोबाईल सर्वांना गरजेचा झाला आहे....