मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अश्रू

       असं म्हणतात ' अश्रू ' हे दुबळ्या मनाचे प्रतीक असते. असेलही कदाचित. पण.... मानवाच्या भाव - भावनांचा विचार करता ' अश्रू ' या शब्दाला व त्यामागील भावनेला फार महत्त्व आहे. प्रत्येक माणसाचं मन सारखं नसतं. कठोर , मृदू , दयाळू , तटस्थ , खंबीर , हळवं... असे अनेक प्रकार.       परमेश्वरानं माणसाच्या झोळीत सुखा बरोबर दुःखाचेही दान टाकले. अन ते दुःख व्यक्त करण्यासाठी अश्रुंची निर्मिती केली असावी. पण त्यातही स्री पुरुष भेदाभेद आढळतो. स्री अश्रुंना पटकन वाट मोकळी करुन देते. जसे आकाशातील काळ्याकुट्ट ढगांना गार हवेचा स्पर्श झाला की पावसाची जशी बरसात होते , अगदी तसे..... पुरुष मात्र पांढऱ्या ढगांसारखे असतात.....   सुख जेव्हा आनंदाच्या अत्युच्य सीमा गाठते. तेव्हाही अश्रुंना आवर घालता येत नाही. आणि अति संवेदनशील प्रसंगी , वाईट घटनांच्या प्रसंगीही आवर घालणे अवघडच.... निसर्गातील मनमोहक दृश्यांनीही आनंदाश्रू तरळतात. उंचावरुन पडणारा नयनरम्य धबधबा , रानफुलांवर बागडणारी ती नाजूकशी रंगबेरंगी फुलपाखरे , वाऱ्याची नाजूकशी झुळूक , पक्ष्यांचा तो किलबिला...

मूल्यवर्धन: काळाची गरज

  आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.   देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी. परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची. आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना. प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावन...

माझा यशस्वी विद्यार्थी

  शिक्षण सेवेत सन 2000 पासून आज 20 वर्ष पूर्ण झाली. 20 पिढ्यांच भविष्य प्रामाणिकपणे घडविलं याचा सार्थ अभिमान वाटतोच. का वाटू नये, जो स्वत:चं कार्य स्वत:च्या नजरेत उत्तम पाहतो त्याच्या कार्याचा प्रामाणिक प्रयत्न समाजाच्या नजरेत कौतुकास पाञ ठरतो. मी या लेखातून एक प्रांजळ मत मांडू इच्छिते की , लोकांच्या नजरेत राहण्यापेक्षा स्वत:च्या नजरेत उत्कृष्ट बनावं. संस्कार व मूल्यवर्धनातून आजपर्यंत कित्येक विद्यार्थी घडवित गेले, घडवितही आहे. मग त्या लिस्टमध्ये लक्ष्मी कोनापूरे, अश्विनी कोनापूरे, राहूल थंब, गौरीशंकर कोनापूरे, सिध्दू, वंदना, समीर, सोनाली, राधिका असो नाहीतर आत्ताचा शुभम, राही व गुरू असो, प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या कौतुकपूर्ण गुणवत्ता व हुशारीतून पटकन लक्षात येतो. पण... आज 1999 साल सप्टेंबर महिना आठवतोय. 1997-1999 असा डी. एड. शैक्षणिक प्रवास संपवून मी बार्शी हून घरी परतले. घरात वडिलांसोबत राजर्षि शाहू महराज प्राथमिक शाळेचे संस्थापक श्री. अनिल वाघमारे , वडिलांचे मिञ , वडिलांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यांच्याशी वडिलांनी माझी ओळख करून दिली , तेव्हा अनुभव असावा म्हणून मला दूस...

व्यवसाय मार्गदर्शन : मोबाईल टेक्निशियन

     मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर बदलत आहे. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईल धारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन , जोडणी , वितरण , विक्री पश्चात सेवा आदींच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यात कुशल यांत्रिक मनुष्यबळाची गरज बघता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र युवकांना लाभदायी ठरणारे अखंड सुरु राहणारे क्षेत्र आहे. म्हणून मोबाईल दुरुस्ती हा सद्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध नाही. डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विविध संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी तीन महिने , सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात येतो.      आज मोबाईल सर्वांना गरजेचा झाला आहे....