सुमन तिजोरे जि.प. प्राथ. शाळा वडाळा बहिरोबा ता.नेवासा , जि. अहमदनगर मूल्यशिक्षण हा शब्द मूल्य आणि शिक्षण या दोन शब्दांचा मिळून तयार झाला आहे मूल्य हा मुळात संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ मोल असा आहे शिक्षण हा मराठी शब्द शिक्षा या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे शिक्षा हा शब्द शिक्ष् या धातूपासून म्हणजे मुलं रूपा पासून तयार झालेला आहे शिक्ष् म्हणजे ज्ञान मिळवणे उपदेश करणे यानुसार मूल्य शिक्षण म्हणजे मोलाची ज्ञान प्राप्ती किंवा मोलाचा उपदेश करणे मूल्यशिक्षला इंग्रजीत value Education म्हणतात या इंग्रजी शब्दाचे मूळ valer या लॅटिन शब्दात आहे , valer चा अर्थ मूल्यवान असणे असा होतो तर Ed u cation या इंग्रजी शब्दाचे मूळ educatum, educere educare या लॕटीन शब्दांमध्ये Educcatum चा अर्थ शिकविणे असा होतो Educare चा अर्थ उन्नयन करणे हा आहे म्हणजे पालन करणे, पोषण करणे, संवर्धन करणे होय या उत्पत्ती वरून असे स्पष्ट होते की मूल्य शिक्षण म्हणजे मूल्यवान असण्यासाठी शिकविणे, उन्नयन करणे पालन करणे, पोषण करणे, व्यक्तीच्या शारीरिक मानसिक सामाजिक समायोजन यांन...