असं म्हणतात ' अश्रू ' हे दुबळ्या मनाचे प्रतीक असते. असेलही कदाचित. पण.... मानवाच्या भाव - भावनांचा विचार करता ' अश्रू ' या शब्दाला व त्यामागील भावनेला फार महत्त्व आहे. प्रत्येक माणसाचं मन सारखं नसतं. कठोर , मृदू , दयाळू , तटस्थ , खंबीर , हळवं... असे अनेक प्रकार. परमेश्वरानं माणसाच्या झोळीत सुखा बरोबर दुःखाचेही दान टाकले. अन ते दुःख व्यक्त करण्यासाठी अश्रुंची निर्मिती केली असावी. पण त्यातही स्री पुरुष भेदाभेद आढळतो. स्री अश्रुंना पटकन वाट मोकळी करुन देते. जसे आकाशातील काळ्याकुट्ट ढगांना गार हवेचा स्पर्श झाला की पावसाची जशी बरसात होते , अगदी तसे..... पुरुष मात्र पांढऱ्या ढगांसारखे असतात..... सुख जेव्हा आनंदाच्या अत्युच्य सीमा गाठते. तेव्हाही अश्रुंना आवर घालता येत नाही. आणि अति संवेदनशील प्रसंगी , वाईट घटनांच्या प्रसंगीही आवर घालणे अवघडच.... निसर्गातील मनमोहक दृश्यांनीही आनंदाश्रू तरळतात. उंचावरुन पडणारा नयनरम्य धबधबा , रानफुलांवर बागडणारी ती नाजूकशी रंगबेरंगी फुलपाखरे , वाऱ्याची नाजूकशी झुळूक , पक्ष्यांचा तो किलबिला...
आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात. देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी. परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची. आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना. प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावन...